आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने ओपेक आणि संलग्न तेल उत्पादक देश चिंतेत पडले आहेत. मंदीच्या भीतीने कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशा स्थितीत अनेक जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडल्या असल्याने त्यांना कच्चे तेल किती पाठवायाची ही चिंताही या तेल संघटनेला भेडसावत आहे.
सौदी अरेबिया आणि रशिया सारखे तेल उत्पादक देशही चिंताग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या तेल उत्पादक देशांनी जूनमध्ये कच्च्या तेलाचा दर सर्वाधिक १२० अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल इतका वाढला होता. त्यावेळी वाढलेल्या भावाचा लाभ या देशांनी घेतला. अमेरिकेतही कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे.
अमेरिकन बाजारात सोमवारी कच्च्या तेलाचा दर ८९ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल होता. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ९५.५० अमेरिकन डॉलर्स होता.
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ओपेक सदस्य आणि संलग्न देशांनी (सदस्य नसलेल्या रशियासाह) ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सप्टेंबरसाठी प्रति दिन १ लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही ऑक्टोबरमध्ये तेवढेच तेल उत्पादन करण्याचा तेल उत्पादक संघटनांचा निर्णय आहे. सोमवारच्या बैठकीतही तेल उत्पादनात वाढ न करण्याचा निर्णय होणार आहे, असे एका विश्लेषकाने सांगितले.