सायबर गुन्हे हे ‘डिजिटल दरोडे’ - सर्वोच्च न्यायालय 'एआय' ने बनविलेली संग्रहित प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

सायबर गुन्हे हे ‘डिजिटल दरोडे’ - सर्वोच्च न्यायालय

सायबर गुन्ह्यांचे वर्णन ‘डिजिटल दरोडा’ असे करत, सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विविध १२ राज्यांमध्ये दोन व्यक्तींविरुद्ध प्रलंबित असलेले ३० हून अधिक गुन्हेगारी खटले एकत्र करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सायबर गुन्ह्यांचे वर्णन ‘डिजिटल दरोडा’ असे करत, सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विविध १२ राज्यांमध्ये दोन व्यक्तींविरुद्ध प्रलंबित असलेले ३० हून अधिक गुन्हेगारी खटले एकत्र करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या कंपनीचे बँक खाते 'म्युल अकाऊंट' म्हणून वापरण्यास परवानगी दिल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, ‘डिजिटल अरेस्ट आणि अशा प्रकारचे सायबर गुन्हे हे डिजिटल दरोडे आहेत, अशा व्यक्तींना कोणतीही न्यायालयीन सवलत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’.

वृद्धांना लक्ष्य

ज्येष्ठ नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकवणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी रॅकेटबद्दल न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे नमूद केले. “केरळच्या एर्नाकुलम येथील एका ८१ वर्षीय वृद्धाची १.९० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि त्यांची रक्कम तुमच्या 'म्युल खात्यात जमा झाली,’ असे सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान सुनावले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; अनेक वाहनांचे नुकसान, एक जखमी, Video

Mumbai : २८ बांधकामांवर कारवाई; बोरिवली-विरार विस्तार मार्गाचा मार्ग मोकळा

Mumbai : ७ आरएमसी कारखान्यांना पालिकेची नोटीस; सात दिवसांत त्रुटी दूर करण्याचे निर्देश

Mumbai : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जागतिक डंका; आयबी शाळांच्या जागतिक क्रमवारीत नववे स्थान