'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रात रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

हे चक्रीवादळ आज २ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० ते उद्या ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल.

Krantee V. Kale

नवी दिल्ली/मुंबई: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मुरासू' (Murasu) हे चक्रीवादळ हळूहळू रौद्ररूप धारण करीत असून, ते भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज मध्यरात्री (२ नोव्हेंबर) ते उद्या पहाटेच्या दरम्यान (३ नोव्हेंबर) आंध्र प्रदेशमधील नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे दक्षिण आणि मध्य भारतातील राज्यांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताशी ११५ किमी वेगाने वाहणार वारे; आंध्रच्या काही भागांत 'रेड अलर्ट'
'मुरासू' चक्रीवादळ किनारपट्टीजवळ पोहोचल्यामुळे समुद्रात सध्या ९५ ते १०५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहात असून, वादळाचा लँडफॉल (Landfall) होताना हा वेग ११५ ते १२० किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज २ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० ते उद्या ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान ओंगोलजवळ, नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडेल. यामुळे हवामान खात्याने आंध्र प्रदेशच्या नेल्लोर, बापटला, प्रकाशम, तिरुपती या जिल्ह्यांसह किनारी भागात 'रेड अलर्ट' जारी केला असून, मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खबरदारीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात आहेत.

चेन्नईसह अनेक भागांत शाळांना सुट्टी
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नई, तिरुवल्लूर आणि पालनाडू या जिल्ह्यांमधील शाळा आणि शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
मुरासू चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दुपारनंतर राज्यातील विदर्भ (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया), मध्य महाराष्ट्र (पुणे (घाट माथा), सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर) आणि दक्षिण कोकण (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी) या भागांत हवामानात मोठा बदल होईल. या परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज (दि.२) दुपारपासून ते उद्यापर्यंत (३ नोव्हेंबर) या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई आणि आसपासच्या भागात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील.

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण