Mumbai High Court 
राष्ट्रीय

टूथपेस्टवरील `त्या` शब्दांचे लेबल हटवणार; 'डाबर'ची उच्च न्यायालयात हमी

लेबलवर केलेले दावे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देत अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनीला संबंधित शब्द हटवण्यासाठी नोटीस दिली होती.

Swapnil S

मुंबई : डाबर मेस्वाक टूथपेस्ट आणि डाबर हर्ब-१ अँटी-बॅक्टेरियल टूथपेस्ट तुलसी या दोन उत्पादनांच्या लेबलवरून अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि एनाल्जेसिक हे शब्द जूनपासून काढून टाकले जातील, अशी हमी डाबर इंडिया लिमिटेडने उच्च न्यायालयात दिली आहे.

लेबलवर केलेले दावे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देत अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनीला संबंधित शब्द हटवण्यासाठी नोटीस दिली होती. त्या नोटीशीला कंपनीने आव्हान दिले होते.

डाबर इंडिया लिमिटेडच्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Mumbai : मालमत्ता पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव FSI वर प्रीमियम आकारणार, BMC च्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडणार

Mumbai : सीसी रस्त्यांसाठी आणखी ६,६०० कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सीसी

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

यशोमती ठाकूर यांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश