राष्ट्रीय

एड‌्स‌संबंधित आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण घटले; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती

देशात एड्सशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण ७९ टक्क्याने घटले आहे, तर एचआयव्ही प्रादुर्भावाचे प्रमाण २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये ४४ टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली.

Swapnil S

इंदूर : देशात एड्सशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण ७९ टक्क्याने घटले आहे, तर एचआयव्ही प्रादुर्भावाचे प्रमाण २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये ४४ टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली.

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, २०१० पासून आतापर्यंत एचआयव्हीचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण ४४ टक्क्यांनी घटले आहे. २०३० पर्यंत एड्स निर्मूलनाचे संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. देशात सध्या राष्ट्रीय एड‌्स व एसटीडी नियंत्रण प्रकल्पाचा पाचवा टप्पा सुरू आहे. नवीन आयडीएस प्रकल्पात ‘चाचणी आणि उपचार’ हे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. २०३० पर्यंत ‘एड‌्स’ला हद्दपार करण्यासाठी ‘नाको’ (एनएसीओ) व एड‌्स नियंत्रण सोसायट्या ९५-९५-९५ फॉर्म्युल्याने प्रयत्न करत आहेत. देशातील ९५ टक्के रुग्णांना हे माहित असले पाहिजे की त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे, ९५ टक्के रुग्णांना उपचार मिळाले पाहिजेत आणि ९५ टक्के रुग्णांचा विषाणूचा भार अँटीरेट्रोव्हायरल थेरपीच्या औषधांनी कमी झाला पाहिजे, असे ते म्हणाले. सध्या ८१ टक्के रुग्णांना माहीत आहे की त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे, ८८ टक्के रुग्णांना उपचार दिले जात आहेत, असे ते म्हणाले.

देशात एड‌्सचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण ४४ टक्क्याने कमी झाले आहे. २०१० पेक्षा २०२३ मध्ये एड‌्समुळे मृत्यूचे प्रमाण ७९ टक्क्याने घटले आहे. सध्या जागतिक पातळीवर एड‌्सचा प्रसार होण्याचा दर ०.७० टक्के आहे, तर भारतात हाच दर ०.२० टक्के आहे. एड‌्सविरोधात प्रदीर्घ लढा देऊन भारताने मजबूत वैद्यकीय यंत्रणा तयार केली आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, एड‌्सच्या रुग्णांना मोफत एड‌्सची औषधे केंद्र सरकार पुरवत आहे. तसेच जे लोक चाचणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळतात. त्यांना तातडीने औषधे पुरवली जातात. भारतीय औषध कंपन्या एड‌्सची स्वस्त व किफातशीर दरांची औषधे आफ्रिका, द. आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांना पाठवतात, असेही नड्डा म्हणाले.

२०२८ पर्यंत एड‌्स राज्यातून हद्दपार करण्याचे धोरण मध्य प्रदेश सरकारने आखले आहे. सरकार 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वावर काम करत आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.

टॅटू काढताना खबरदारी घ्यावी

तरुणांनी टॅटू काढताना खबरदारी घ्यावी. टॅटू काढल्यानंतर अनेक लोक एड्सग्रस्त झाले आहेत. मला तरुणांना या धोक्याची जाणीव करून द्यायची आहे. एड‌्स रुग्णांना दूर ठेवण्याचे आणि संक्रमित लोकांबद्दल संवेदनशील वृत्ती अंगिकारण्याचे आवाहन नड्डा यांनी केले.

मुंबापुरी सज्ज! गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी; पुढील वर्षी १४ सप्टेंबरला बाप्पांचे आगमन

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!