राष्ट्रीय

Delhi : 'नात्याला काही अर्थ नाही' सुसाइड नोट लिहून प्रसिद्ध उद्योजकाच्या सुनेची आत्महत्या, पतीच्या दुसऱ्या लग्नाचीही चर्चा

सुप्रसिद्ध कमला पसंद आणि राजश्री पान मसाला समूहाचे मालक किशोर चौरसिया यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू वसंत विहार परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

नेहा जाधव - तांबे

सुप्रसिद्ध कमला पसंद आणि राजश्री पान मसाला समूहाचे मालक किशोर चौरसिया यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू वसंत विहार परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. दीप्ती चौरसिया (वय ४०) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात ओढणीला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

नाते संबंधात तणाव

घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यात, “नात्यात प्रेम नाही, विश्वास नाही तर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही”, असे लिहिले असल्याची माहिती मिळते. तर, ANI च्या माहितीनुसार, पोलिसांना ठिकाणावरून एक डायरीही सापडली आहे ज्यामध्ये दीप्ती यांनी पतीसोबत झालेल्या वादांचा उल्लेख केला आहे.

दीप्ती आणि तिचे पती हरप्रीत चौरसिया यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून पती–पत्नीमध्ये वाद वाढत असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

हरप्रीतच्या ‘दुसऱ्या विवाहा’बाबत अंदाज

News18च्या वृत्तानुसार, हरप्रीत यांनी दुसरे लग्न केल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीबाबत दक्षिण भारतीय अभिनेत्री असल्याची चर्चा सुरू आहे.

कुटुंबीयांनी दाखल केली तक्रार

दीप्तीच्या कुटुंबीयांनी हरप्रीत आणि चौरसिया कुटुंबातील इतर सदस्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

गुटखा उद्योगातील कोट्यवधींचं साम्राज्य

चौरसिया कुटुंबाने देशभर लोकप्रिय असलेल्या कमला पसंद आणि राजश्री पान मसाला ब्रँड्सच्या माध्यमातून कोट्यवधींचे औद्योगिक साम्राज्य उभारले आहे. कानपूरातील फीलखाना परिसरात कमला कांत चौरसिया यांनी छोट्या स्तरावर गुटखा व पान मसाला विक्री सुरू केली होती. १९८० च्या उत्तरार्धात घरगुती पातळीवर उत्पादनास सुरुवात झाली आणि व्यवसाय झपाट्याने वाढत गेला.

सध्या कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयांत असून चौरसिया कुटुंबाने स्वतःचे स्वतंत्र औद्योगिक जाळे उभारले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर

"माझा मुलगा असा वागला असता तर..."; पंकजा मुंडेंनी घेतली गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट

मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?