राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी दिली भारत-चीन सीमेला भेट ; जवानांसोबत केला दसऱ्याचा सण साजरा

यावेळी तवांग येथील भारत-चीन सीमेवर राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन देखील करण्यात आलं.

नवशक्ती Web Desk

आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीनच्या सीमेला जाऊन भेट दिली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज अरुणाचल प्रदेशात जाऊन भारतीय सैन्य दलासोबत दसरा साजरा केला. यावेळी तवांग येथील भारत-चीन सीमेवर राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन देखील करण्यात आलं.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रपूजनाचा व्हिडियो 'एक्स' या सोशलमीडिया प्लॅटफोर्मवर शेयर करत म्हटलं आहे की, 'विजयादशमीच्या पवित्र दिवशी तवांगमध्ये शस्त्रपूजा'. जवानांना संबोधन करताना संरक्षण मंत्र्यांनी भारतीय जवानांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, मी आजच्याच दिवशी 4 वर्षांआधी इथं आलो होतो, मला वाटलं की मी तुमच्यासोबत विजयादशमी साजरी करावी. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमच्यावर गर्व आहे. मला अभिमान वाटतो.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील बमला येथून सीमेच्या पलीकडे असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचं निरीक्षण केलं आहे. अरुणाचल प्रदेशातील बमला इथं भारत-चीन सीमेवर देशाच्या सेवेत तैनात असलेल्या सगळ्या लष्करी जवानांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्या दिल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी