राष्ट्रीय

तृणमूल, सपानंतर ठाकरे गटाचा दिल्लीत 'आप'ला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गुरुवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

खासदार अनिल देसाई म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आपल्या पक्षाने 'आप'ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला पाठिंबा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर लगेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video