संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीची उडी; अजित पवार पक्षाचे ११ उमेदवार रिंगणात

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला जनतेने पसंती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाचे ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणुकीची घोषणा नवीन वर्षांत फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यात बदली येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलायम सिंह यांची लढत काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांच्याशी होणार आहेत. तर, बुराडीतून रतन त्यागी, चांदनी चौकमधून खालिद उर रहमान, बल्ली मारन मधून मोहम्मद हारुन आणि ओखलामधून इम्रान सैफी यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय, छतरपूरमधून नरेंद्र तंवर, लक्ष्मी नगरमधून नमहा, गोकुळपुरीतून जगदीश भगत, मंगोलपुरीतून खेम चंद, सीमापुरीतून राजेश लोहिया आणि संगम विहारमधून कमर अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आप आघाडीवर आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल