संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

Delhi Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी NIA चे आठ ठिकाणी छापे

दिल्ली दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकले. पथकाने संशयित आरोपी जसीर बिलाल वानच्या घराची झडती घेतली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकले. पथकाने संशयित आरोपी जसीर बिलाल वानच्या घराची झडती घेतली आहे.

जसीर बिलाल वानी १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी एक मानला जातो. तो पदवीधर आहे. एनआयएच्या मते, वानीने पुलवामातील एका डॉक्टर आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या आत्मघाती हल्लेखोर नबी याच्यासोबत काम केले असल्याचा संशय आहे.

वानी हा स्फोटकाच्या तंत्रज्ञानाचा जाणकार होता. त्याने ड्रोनसह गर्दीच्या ठिकाणी वापरता येतील असे लहान बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे स्फोटकाचे डिझाइन हे दहशतवादी संघटना हमास आणि आयसिससारखे होते. वानी आणि नबी याची भेट मागील वर्षी झाली. यानंतर वानीला जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील होणार होता; पण नबीने त्याला आत्मघाती हल्लेखोर व्हायला प्रवृत्त केले.

मसाला बाँडप्रकरणी केरळचे मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

ही नोटीस २०१९मधील मसाला बाँड प्रकरणातील ४६८ कोटींच्या व्यवहारांशी संबंधित आहे. ईडीच्या मते, बाँडमधून मिळालेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये, ईडीने बाँडच्या रकमेचा वापर आणि फेमा नियमांचे पालन यासंबंधीच्या तपासासाठी माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांना समन्स बजावले होते.

दिल्लीसह अनेक विमानतळांवरील जीपीएस सिग्नलच्या डेटामध्ये छेडछाड

संसदेच्या या अधिवेशनात एसआयआरसह वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता असतानाच पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने दिल्लीसह आदी महत्वाच्या विमानतळाच्या संदर्भातील महत्वाची माहिती सभागृहात दिली.

विमानतळांची नावे

नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हा खुलासा केला आहे. ही माहिती देताना नायडू यांनी या घडलेल्या घटनांची माहिती आणि त्यानंतर या समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही संसदेत दिली. यामध्ये दिल्ली, कोलकाता, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई