(संग्रहित छायाचित्र) 
राष्ट्रीय

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला अनुमती

दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच गृह मंत्रालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची अनुमती सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच गृह मंत्रालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची अनुमती सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयावर ‘आप’ने जोरदार टीका केली असून भाजप सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांना मार्च महिन्यात अटक केल्यानंतर ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. भाजप विविध यंत्रणांचा गैरवापर करीत आहे हे स्पष्ट आहे. निवडणुका जवळ आलेल्या असतानाच कारवाईची अनुमती देणे ही सत्तेच्या गैरवापराची व्याप्ती दर्शविते, असे ‘आप’ने म्हटले आहे.

केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला असून ते दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगविरोधी कायद्यान्वये गृह मंत्रालयाने ईडीला केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची अनुमती दिली आहे.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : आता हापूस आंबे, काजू वर्षभर उपलब्ध होणार; २ हजार टन क्षमतेच्या शीतगृहाची निर्मिती

नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीसह विक्रीवर बंदी; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्त