राष्ट्रीय

श्रद्धा वालकर प्रकरणी उच्‍च न्यायालयाचा माध्यमांना दणका; कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती प्रसारित केल्यास...

नवशक्ती Web Desk

१८ मे २०२२ला नवी दिल्लीत राहत असलेल्या आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे तुकडे करून ३ आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर हळूहळू आसपासच्या परिसरात हे तुकडे फेकून दिले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणाची चांगलीच चर्चा ही प्रसार माध्यमांवर झाली होती. अनेक माध्यमांनी गोपनीय माहिती मिळवून ती आधीच आपल्या माध्यमांवर प्रसारित केली होती. याप्रकरणी आता दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्‍यास किंवा त्‍याची माहिती देण्‍यास सर्व माध्यमांना न्‍यायालयाने सक्त मनाई केली आहे. या प्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी दाखल केलेल्‍या आरोपपत्रातील गोपनीय माहिती प्रकाशित करणे, छापणे किंवा प्रसारित करू नये. तसेच या प्रकरणाच्या तपासादरम्यान गोळा केलेली इतर सामग्री प्रसारित करण्यापासून प्रसिध्दी माध्‍यमांना प्रतिबंधित करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्‍ली पोलिसांनी दाखल केली होती. या याचिकेवर न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी केली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सर्व माध्यमांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये किंवा दाखवू नये, असे निर्देश न्‍यायमूर्तींनी केंद्र सरकारला दिले आहेत.

ॲस्ट्राझेनेका ‘कोविड-१९ लस’ मागे घेणार

१५० वर्षांची ‘बेस्ट’ सेवा,बेस्ट बसेसच्या आठवणींना उजाळा! आणिक बस आगारात प्रदर्शन

एअर इंडिया एक्स्प्रेसची ८० उड्डाणे रद्द,विमानतळांवर प्रवासी बसले तिष्ठत!

‘कॉमन मॅन’ चा द्वेषाला नकार

विधान परिषदेच्या चार जागांसाठी १० जूनला मतदान