दिल्ली हॉस्टेल इमारत दुर्घटनेप्रकरणी सोमवारी पोलिसांनी हॉस्टेलचा मालकाला राजस्थानमधील भिवाडी येथून ताब्यात घेतले आहे. X |ANI
राष्ट्रीय

Delhi Building Collapse : इमारतीचा मालक ताब्यात

दिल्ली हॉस्टेल इमारत दुर्घटनेप्रकरणी सोमवारी पोलिसांनी हॉस्टेलचा मालक हरिराम बन्सल याला राजस्थानमधील भिवाडी येथून ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली हॉस्टेल इमारत दुर्घटनेप्रकरणी सोमवारी पोलिसांनी हॉस्टेलचा मालक हरिराम बन्सल याला राजस्थानमधील भिवाडी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२ लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बचावकार्य पूर्ण झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने, या दुर्घटनेसाठी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली विद्यापीठ हे दोन्ही जबाबदार आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय आणि खराब आहे. सरकार जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. न्यायालयाने एमसीडी, दिल्ली सरकार, केंद्र सरकार, एनएचआरसी आणि दिल्ली विद्यापीठाला १० दिवसांच्या आत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : 'म्हात्रेसारख्यांना मोकाट फिरण्याचा अधिकार नाही' - सर्वोच्च न्यायालय

National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला

गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती

उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही