राष्ट्रीय

मुंबई-दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; काँग्रेसवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, यावेळी त्यांनी काँग्रेसवर केली टीका

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई दिल्ली महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. दौसा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी भंडारेज ते सोहना या तयार महामार्गाचे उद्घाटन केले. दिल्ली-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असेल. यावेळी जनतेला संबोधन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सीमाभागात रस्ते बांधण्यास घाबरत होते. आपण बांधलेल्या रस्त्याने शत्रू देशात येतील, अशी त्यांना भीती वाटत होती. आपल्या सैनिकांच्या शौर्य व धाडसाला काँग्रेस का कमी लेखत होती? हे मला कळत नाही." असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हेच विकसित होणाऱ्या भारताचे भव्य चित्र असून असे आधूनिक रस्ते बनतात तेव्हा देशाच्या प्रगतीला चालना मिळते. हा प्रकल्प राजस्थानसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातचे चित्र बदलून टाकणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणखी एक बाजू आहे. तो तयार झाल्यावर शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांना अनेक सुविधा मिळतात. दिल्ली - दौसा - लालसोट दरम्यानच्या या महामार्गाप्रमाणे जयपूर ते दिल्ली प्रवासाचा वेळ निम्म्या वेळेने कमी होईल." असे त्यांनी सांगितले.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद