दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' करा! भाजप खासदाराची पत्राद्वारे केंद्राकडे मागणी 
राष्ट्रीय

दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' करा! भाजप खासदाराची पत्राद्वारे केंद्राकडे मागणी

केंद्र सरकारने केरळचे नाव ‘केरळम’ करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असतानाही पश्चिम बंगालचे नाव बदलले नाही, त्यावरून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केरळचे नाव ‘केरळम’ करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असतानाही पश्चिम बंगालचे नाव बदलले नाही, त्यावरून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर दिल्लीचे नाव बदलण्यासाठी भाजपच्या खासदाराने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

दिल्लीचे प्राचीन वैभव जपण्यासाठी दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार राजीव खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दिल्लीत आजही पुराणा किल्ला परिसरामध्ये उत्खननादरम्यान, इंद्रप्रस्थाचे अवशेष सापडल्याचे अनेक इतिहासकरांचे म्हणणे आहे. अनेक संघटना आणि नागरिकांकडूनही दिल्लीचे नाव बदलण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

नाव संयुक्तिक

दिल्लीचा संबंध पौराणिक काळातील इंद्रप्रस्थ नगरीशी आहे, पांडवांनी वसवलेली ही नगरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. दिल्ली हे नाव बदलून गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव अधिक संयुक्तिक ठरेल, असा दावा खंडेलवाल यांनी केला.

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ