राष्ट्रीय

दिल्लीत भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील जैतपूर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास, समाधी स्थळाची १०० फूट लांबीची भिंत अचानक जवळच्या अनेक झोपडपट्ट्यांवर कोसळली. त्यानंतर ढिगाऱ्याखालून ८ जणांना वाचवण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील जैतपूर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास, समाधी स्थळाची १०० फूट लांबीची भिंत अचानक जवळच्या अनेक झोपडपट्ट्यांवर कोसळली. त्यानंतर ढिगाऱ्याखालून ८ जणांना वाचवण्यात आले. त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी तैनात आहेत.

झोपडपट्ट्यांमध्ये आणि भिंतीखाली आणखी कोणी गाडले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. सर्वांची ओळख पटली आहे. रुबिना (२५ वर्ष), डॉली (२५ वर्ष), रुखसाना (६ वर्ष) आणि हसिना (७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. जखमी हिसबुलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

Mumbai : सप्टेंबर अखेरपर्यंत सायन पूल खुला करण्याचे नियोजन; पुलाच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डनचा पर्याय - महापौर रितू तावडे

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या