राष्ट्रीय

Air India Case : डीजीसीएचा एअर इंडियाला पुन्हा दणका! आधी ३० लाखांचा दंड आणि आता...

एअर इंडियाच्या (Air India Case) विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या प्रकरणामध्ये डीजीसीएने एअर इंडियाला डबल दणका दिला

प्रतिनिधी

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या प्रकरणात (Air India Case) आता आणखी एका बातमी समोर आली आहे. एका पुरुषाने वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याची घटना ६ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. मात्र, हे प्रकरण खूप उशिराने प्रकाशझोतात आले. याप्रकरणी आता डीजीसीएने दुसऱ्यांदा एअर इंडियाला दणका दिला आहे. डीजीसीएने (DGCA) सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आले नाही. या घटनेची तक्रार न केल्याबद्दल एअर इंडियाला १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, यापूर्वीही डीजीसीए नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. एअर इंडियाचे पॅरिस ते दिल्ली या विमानात हा प्रकार घडला होता. एअर इंडिया विमानामध्ये एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला पोलिसांनी अटक केली होती. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी त्याला ४ महिन्यांची बंदीही घातली आहे. 'सदरचा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे, असे प्रकार विमानात घडत असतील तर ते एअर इंडियाचे अपयश आहे,' असे डीसीजीएनने म्हटले होते.

पीएम मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युक्रेन संघर्षावर महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'भारत-रशिया मैत्री अढळ'

महायुती सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा रिपोर्ट कार्ड, बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्र आता...

IndiGo एअरलाइन्सचा माफीनामा; प्रवाशांसाठी हॉटेल-रिफंड सुविधा, “आम्ही लवकरच....

राज्यातील निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरलाच; मतमोजणीवर 'सर्वोच्च' आदेश

RBI चा सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात; EMI चा भार होणार कमी