Representative image 
राष्ट्रीय

विमानतळावरील प्रवाशांसाठी DGCA चा नवा आदेश, मास्कशिवाय प्रवास करता येणार नाही, केल्यास...

नवीन नियमांनुसार, विमानतळावर आणि विमानात चढताना मास्कशी संबंधित प्रोटोकॉलमध्ये कोणतीही शिथिलता असणार नाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - येत्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही विमानाने कुठे जाणार असाल किंवा विमानतळावर कोणाला सोडायला, आणायला जाणार असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण आता तुम्ही मास्कशिवाय विमानतळावर प्रवेश केलात तर सीआयएसएफचे जवान तुमच्यावर कारवाई करू शकतात. नागरी हवाई वाहतूक नियमन एजन्सी DGCA ने पुन्हा एकदा विमानतळ आणि विमानांमध्ये चढण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे कडक केली आहेत. नवीन नियमांनुसार, विमानतळावर आणि विमानात चढताना मास्कशी संबंधित प्रोटोकॉलमध्ये कोणतीही शिथिलता असणार नाही. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर डीजीसीएने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

DGCA ने बुधवारी सांगितले की, विमाने आणि विमानतळांवर मास्क न घालणे आता नियमांच्या विरोधात मानले जाईल आणि जे प्रवासी त्याचे पालन करणार नाही त्यांना विमानतळावरूनच परत पाठवले जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितले की, प्रवाशांनी मास्क घालण्यास वारंवार नकार दिल्यास आणि कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन न केल्यास, टेक-ऑफ पूर्वी त्यांना उतरवले जाईल.

डीजीसीएने असेही म्हटले आहे की, नियमांविरुद्धच्या कारवाईअंतर्गत अशा प्रवाशांना सीआयएसएफ जवानाच्या ताब्यात दिले जाईल आणि त्याच्यावर दंडही आकारला जाईल. अलीकडच्या काही दिवसांत, कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर विमानतळ किंवा विमानांमध्ये मास्कच्या नियमांमध्ये काही शिथिलता देण्यात आली होती, परंतु आता पुन्हा विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. कोविड-19 अद्याप गेलेला नाही, त्यामुळे कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. न्यायालयाने म्हटले होते की, जो व्यक्ती कोविड नियमांचे पालन करत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर दंड आकारला जावा आणि त्यांना नो फ्लाय झोनच्या यादीत समाविष्ट केले जावे. त्यामुळे DGCA अधिकाऱ्यांनी विमानतळावर कोविड नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. डीजीसीएने यासाठी बंधनकारक सूचना द्याव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल याची खात्री करण्यासाठी आपल्या कर्मचारी, एअर होस्टेस, कॅप्टन, पायलट इत्यादींना सांगावे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत