CJP ही अतिरेक्यांची बी टीम - धर्मेंद्र प्रधान  
राष्ट्रीय

CJP ही अतिरेक्यांची बी टीम - धर्मेंद्र प्रधान

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. सीजेपीने आपल्या राजीनाम्याची मागणी करत देशभर आंदोलन पुकारले असतानाच, धर्मेंद्र प्रधान यांनी या आंदोलकांवर अत्यंत बोचरी टीका करताना सीजेपी दहशतवाद्यांची बी टीम आहे असे म्हटले आहे.

प्रधान म्हणाले की, जे लोक लोकशाहीत जनतेकडून नाकारले गेले आहेत, तेच लोक आज विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करून परीक्षा प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.सीजेपीचे आंदोलन काय आहे,'कॉक्रोच जनता पार्टी' या संघटनेने गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील ८ प्रमुख शहरांमध्ये सातत्याने निदर्शने केली आहेत. नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असून, पक्षाने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही सहभाग नोंदवला असून, प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रधानविरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना प्रधान यांनी २१ जून रोजी पार पडलेली नीट पुनर्परीक्षा पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन