राष्ट्रीय

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला आज (दि. १०) सकाळी सुमारे ७.४५ वाजता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील सेंट्रल पार्क विहार परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असून, राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला