राष्ट्रीय

श्री रामाच्या दर्शनासाठी मुंबईतून अयोध्येला जायचंय? तुमच्यासाठी खूशखबर ; 'या' तारखेपासून थेट विमानसेवा सुरू

Swapnil S

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उद‌्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी इंडिगोने मुंबई ते अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक सुखकर होणार आहे. या आधी दिल्ली ते अयोध्या अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतूनही ६ जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असून देशभरातून भक्त अयोध्येत येणार आहेत. सर्वात प्रथम 'इंडिगो'ने दिल्ली ते अयोध्या ही फ्लाईट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुंबईतून अयोध्येला जाण्यासाठी मार्ग सुखकर होणार आहे. विमान वाहतूक कंपनी 'इंडिगो' ३० डिसेंबर पासून दिल्लीतून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरू करत आहे. त्यानंतर ६ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या विमानसेवा सुरू होणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस