राष्ट्रीय

Earthquake : नेपाळमध्ये भुकंपाचे धक्के! भारतातील काही भागांमध्ये बसला हादरा...

नेपाळमध्ये दीड तासांत दोनदा भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. त्यांची तीव्रता एवढी होती की ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिनिधी

बुधवारी पहाटे नेपाळमध्ये ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप आला. यामुळे तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला असून डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील कोसळली. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, दिल्लीमध्येही याचे हादरे बसले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, ९ नोव्हेंबरला रात्री १ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळमधील मणिपूर हे होते. त्याची खोली जमिनीच्या खाली १० किमी होती. याआधी ८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर मिझोराम येथे रात्री १२ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ होती.

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोटी जिल्ह्यात घरे कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी नेपाळ लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीसह यूपी, बिहार, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचा हादरा बसला. काही लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. यापूर्वी १९ ऑक्टोबरला काठमांडूला ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत