राष्ट्रीय

हिवाळ्यात मटार खाल्ल्याने होतात शरीराला भरपूर फायदे

मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा.

Swapnil S

प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या भाज्या उगावतात, ज्या त्या हंगामानूसार त्या त्या भाज्यांचे सेवन आवर्जून करावे. थंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोरी दाण्यांचे मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा. मटार पनीर, मटार-पुलाव, आलुमटार, मटाराचे कटलेट, मटार हलवा अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात मटार तुम्ही वापरू शकता. तर जाणून घेऊयात मटार खाण्याचे फायदे...

जाणून घ्या मटार खाण्याचे फायदे

■ मटारमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास मदत होते, म्हणून वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मटार खावेत.

■ ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मटारचे सूप प्यायल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

■ बध्दकोष्ठतेच्या त्रासावरही मटार फायदेशीर आहे. कारण मटारमध्ये फायबरची मात्रा अधिक असते.

■ मटारमध्ये प्रथिन्यांबरोबरच 'क' जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हाडांच्या

मजबुतीसाठी मटार उपयुक्त ठरतो.

■ भाजलेल्या ठिकाणी मटारची पेस्ट करून लावली तर लगेच आराम मिळतो आणि जखमेमूळे होणारी जळजळही कमी होते.

■ काहीजण मटारची पेस्ट करून तिचा वापर स्क्रब सारखाही करतात, यामुळे त्वचा उजळते. पण अनेकजण मटारचे दाणे फ्रिजरमध्ये साठवून ठेवतात आणि मटारचा हंगाम निघून गेला तरी ते जेवणात वापरतात पण असं करणं चुकीचं आहे. कारण यामुळे मटारमधले पोषणमुल्ये कमी होतात, काहींना नंतर मटार खराब होते. त्यामूळे मटार ही भाजी ज्या मोसमात उपलब्ध होते त्याचवेळी ती खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी

संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला

नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त! २५ डिसेंबरपासून उड्डाण; अकासा एअर, इंडिगोचे वेळापत्रक अखेर जाहीर

भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू