राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

महाराष्ट्र, हरयाणाच्या मतदार याद्यांचा डेटा देण्याची निवडणूक आयोगाची तयारी; राहुल गांधी यांनी केली होती मागणी

राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा ‘फिक्स’ करण्यात आल्या होत्या, याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने केलेली मागणी निवडणूक आयोगाने अखेर मान्य केली. आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या मागणीनुसार तसेच काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेला अनुसरून महाराष्ट्र आणि हरयाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदारयाद्यांचा डेटा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा ‘फिक्स’ करण्यात आल्या होत्या, याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते. यामुळे देशभरात त्याबाबत चर्चा सुरू झाली. स्वतंत्र संविधानिक संस्था असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावर त्यामुळे पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले.

नेमकी तारीख जाहीर करा - राहुल गांधी

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी नवा सवाल केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने मतदार याद्या देण्यासाठीचे पहिले पाऊल टाकले आहे, पण कोणत्या तारखेपासूनचा डिजिटल आणि मशीन रिडेबल फॉरमॅटमधला हा डेटा आयोग शेअर करणार आहे, हे निवडणूक आयोग जाहीर करणार आहे का, असा सवाल गांधी यांनी केला आहे.

काय होती मागणी?

महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीबद्दल राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून आरोप केला होता. यात त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जिंकलेल्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडल्या नाहीत, असा दावा केला होता.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’