नवी दिल्ली : परकीय चलन व्यवहारप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व माजी खासदार महुआ मोईत्रा यांना ‘ईडी’ने नोटीस बजावली आहे. मोईत्रा यांना १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी ‘ईडी’ने बोलवले आहे. भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात लोकपालमध्ये तक्रार दाखल केली होती. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप मोईत्रा यांच्यावर होता. लोकपालनी तक्रार केल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली.