राष्ट्रीय

ईडीच्या 'डलेमन-री' कंपनीवर धाडी; लवासा खरेदी करणाऱ्या कंपनीशी संबंध उघड, ८० लाखांची रोकड जप्त

Swapnil S

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘डलेमन री-आयटी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’च्या प्रकरणात दिल्ली, मुंबई आणि गोवा येथे अनेक ठिकाणी छापे टाकून विविध डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या कंपनीचे संचालक बोगस असून तिचा संबंध पुण्याजवळील लवासा प्रकल्प विकत घेणाऱ्या डार्विन कंपनीचे अजय हरिनाथ सिंग यांच्याशी असल्याचे तपासात उघड होत आहे.

‘डलेमन री-आयटी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी कायदेशार सल्ला, लेखापरीक्षण, कर सल्ला आदी सेवा पुरवते. डलेमन कंपनीने २०२० साली वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक खात्यांतून १८ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यांत वळवली. त्याच दिवशी ही रक्कम डार्विन ग्रुप ऑफ कंपनीज‌्च्या अनेक बँक खात्यांमध्ये आणि अजय हरिनाथ सिंग यांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती.

ईडीच्या तपासात असे लक्षात आले की, ‘डलेमन री-आयटी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संचालक बोगस आहेत. त्यांनी बेकायदेशीरपणे ही रक्कम बँक खात्यांतून फिरवली आणि त्याचा फायदा डार्विन कंपनीचे अजय हरिनाथ सिंग यांना झाला. यासंदर्भात ईडीने नुकत्याच टाकलेल्या धाडींमध्ये ७८ लाख रुपयांची भारतीय चलनातील रोकड आणि २ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त