राष्ट्रीय

आठ हजार भारतीय देश सोडणार;हेन्स्ले अॅण्ड पार्टनर्सचे सर्वेक्षण

व्यवसायाचा विस्तार व चांगले जीवनमान जगण्यासाठी हे भारतीय आता परदेशात राहू इच्छितात.

वृत्तसंस्था

जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनून भारतातील अतिश्रीमंत लोकांना आता मायदेशात राहण्यात काहीच रस राहिलेला नाही, असे दिसून येत आहे. उद्योगपती, कॉर्पोरेट क्षेत्रातील बडे अधिकारी व नोकरदारांना आता परदेशात स्थायिक होण्याचे वाटू लागले आहे. यंदा आठ हजार अतिश्रीमंत भारतीय हे देश सोडून परदेशात स्थायिक होणार आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत वाढत आहे. कोरोनाकाळातही भारताची कामगिरी चांगली राहिली. व्यवसायाचा विस्तार व चांगले जीवनमान जगण्यासाठी हे भारतीय आता परदेशात राहू इच्छितात.

हेन्लीच्या ग्लोबल सिटीझन रिपोर्टमध्ये नमूद केले की, जागतिक व्यवसायाच्या संधी पाहून भारतीयांना परदेशात स्थायिक व्हायचे आहे. कारण कठोर कर नियम व पासपोर्ट संबंधीच्या नियमांमुळे आठ हजार अतिश्रीमंत भारतीय परदेशात राहू इच्छितात.

जगभरात नागरिकत्व मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हेन्स्ले अॅण्ड पार्टनर कंपनीने सांगितले की, अतिश्रीमंत भारतीयांना आता भारतात रस राहिलेला नाही. हेच यामागचे कारण आहे. तर ज्युलिअस बेअर इंडियाच्या संपत्ती नियोजन प्रमुख सोनाली प्रधान म्हणाल्या की, ७० ते ८० टक्के अतिश्रीमंत लोकांनी आपल्यासाठी वेगळी राहण्याची व्यवस्था केली आहे. कोणते मोठे संकट आल्यास ते तत्काळ ते दुसरीकडे जाऊ शकतील.

भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांची अनेक उदाहरणे आहेत. अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष नीरज कंवर यांचे उदाहरण दिले आहे. २०१३मध्ये कंवर हे लंडनला स्थायिक झाले. मी भारतात राहिलो असतो, तर माझी एकच कंपनी असती. ती केवळ भारतातच व्यवसाय बघत राहिली असती, असे कंवर यांनी सांगितले. आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल हेही २०१५मध्ये लंडनला राहायला गेले. तर हीरो सायकलचे अध्यक्ष पंकज मुंजाळ हे युरोपातील ई-बाईक्सचा व्यवसाय वाढवण्यासाठी नऊ महिने लंडनला राहतात. सीरमचे सीईओ आदर पुनावालाही पुणे-लंडन असा निवास सतत करत असतात.

यूएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलियाला पसंती

परदेशी स्थायिक होणारे भारतीय संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ऑस्ट्रेलियाला पसंती देत आहेत. २०१५ ते २०२१दरम्यान नऊ लाख भारतीयांना आपला पासपोर्ट परत केला आहे. यात चिंतेची बाब म्हणजे, ही संख्या वाढत आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियात स्थायिक होताना दिसत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत