राष्ट्रीय

बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा करा! ममतांचे आठवड्याभरात मोदींना दुसरे पत्र

Kolkata Rape-Murder Case: महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवडाभरात दुसऱ्यांदा पाठवले आहे.

Swapnil S

कोलकाता : कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणावरून देशात संतापाची लाट पसरली आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवडाभरात दुसऱ्यांदा पाठवले आहे. या संवेदनशील मुद्द्यावर आपल्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

बलात्कार व हत्या या गंभीर गुन्ह्याबाबत केंद्र सरकारने कडक कायदा तयार करावा. हे खटले किती काळात निकाली काढावेत, याची तरतूदही या प्रस्तावित कायद्यात असायला हवी. ममता यांनी २२ ऑगस्टला पंतप्रधानांना यापूर्वी पत्र पाठवले होते.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर