राष्ट्रीय

EPFO चे पैसे आता स्वयंचलित प्रणालीद्वारे७ ; कोटींहून अधिक PF सदस्यांना दिलासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ७ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया 'ईपीएफओ' लवकरच पूर्णपणे स्वयंचलित करणार आहे. या नवीन सुविधेमुळे सदस्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार असल्याची माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी बुधवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ७ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया 'ईपीएफओ' लवकरच पूर्णपणे स्वयंचलित करणार आहे. या नवीन सुविधेमुळे सदस्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार असल्याची माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी बुधवारी दिली.

सध्या ५ लाख रुपयांपर्यंतचे आगाऊ पैसे काढण्यासाठी स्वयंचलित प्रणाली उपलब्ध असून, यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. आता हीच सुविधा अंतिम पैसे काढण्यासाठी देखील लागू केली जाणार आहे. या सुधारणांनुसार एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा त्याचे पीएफ खाते जुन्या कंपनीकडून नवीन कंपनीकडे आपोआप वर्ग केले जाईल.

नवीन नियम कामगारांच्या आर्थिक हितासाठी

नवीन नियमांमुळे व्यवसाय करणे अधिक सुलभ होणार असून कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. 'ईपीएफओ'ने घेतलेले हे निर्णय कामगारांच्या आर्थिक हितासाठी क्रांतिकारी ठरतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

गुजरातमध्ये सैराट, २३ सेकंदांत १३ वार! प्रेमविवाहाच्या ७ वर्षांनंतर भावाने बहिणीचं पुसलं कुंकू

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू