राष्ट्रीय

निर्यात ३. १२ टक्के वधारली; जानेवारीत पोहोचली ३६.९२ अब्ज डॉलर्सवर

सरकारी आकडेवारीनुसार, अंदाजे दरमहा सुमारे १४ अब्ज डॉलर्सचा युरोपसोबत भारताची सुमारे ८० टक्के मालाची वाहतूक साधारणपणे लाल समुद्रातून होते.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाची निर्यात जानेवारीमध्ये वार्षिक ३.१२ टक्क्यांनी वाढून ३६.९२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ती ३५.८ अब्ज डॉलर्स झाली होती, असे सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये आयात वार्षिक ३ टक्क्यांनी वाढून ५४.४१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये व्यापार तूट १७.४९ अब्ज डॉलर्स झाली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारी कालावधीत निर्यात ४.८९ टक्क्यांनी घसरून ३५३.९२ अब्ज डॉलर्स झाली आहे. आयात ६.७१ टक्क्यांनी घसरून ५६१.१२ अब्ज डॉलर्स झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, जागतिक अनिश्चितता असूनही, आम्ही सकारात्मक वाढ नोंदवली आहे. लाल समुद्रातील भू-राजकीय संकटामुळे जहाजाद्वारे होणारी जागतिक मालवाहतूक विस्कळीत झाली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील व्यापारी मालाची आयातही जानेवारी २०२४ मध्ये ३ टक्क्यांनी वाढून ५४.४१ अब्ज डॉलर्स झाली. तर डिसेंबर २०२३ मधील ५८.२५ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होती. देशाची व्यापारी व्यापार तूट १७.४९ अब्ज डॉलरच्या ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत कमी झाली. व्यापार तूट कमी होणे हे देशाच्या स्थूल आर्थिक मूलभूत बाबींना बळकटी दर्शवते. त्यामुळे रुपयावरील दबाव कमी होण्यास मदत होईल. डिसेंबर २०२३ मध्ये व्यापार तूट १९.८० अब्ज डॉलर्स झाली होती. तांबड्या समुद्राभोवती हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे व्यापार विस्कळीत झाला आहे कारण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकावरील केप ऑफ गुड होप मार्गे शिपमेंट्स आता लांबच्या मार्गाने पाठवाव्या लागतात. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे मालाची एकूण वाहतूकही मंदावली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, अंदाजे दरमहा सुमारे १४ अब्ज डॉलर्सचा युरोपसोबत भारताची सुमारे ८० टक्के मालाची वाहतूक साधारणपणे लाल समुद्रातून होते. या मालांना आता आफ्रिकेतून लांब मार्गावर सुमारे ५ हजार अतिरिक्त नॉटिकल मैल पार करावे लागतात. त्यासाठी आणखी १५ दिवस लागतात, असे ते म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी