राष्ट्रीय

निर्यातदारांची दिल्लीत मंगळवारी बैठक

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बोर्ड ऑफ ट्रेडचे (बीओटी) सर्व सदस्य उपस्थित राहणार

Swapnil S

नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि उद्योग प्रतिनिधींची १६ जानेवारी रोजी बैठक होणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीत रुपया पेमेंट आव्हाने, जागतिक शिपिंगची गरज आणि लाल समुद्रातील संकटामुळे व्यापाऱ्यांसमोरील आव्हाने आणि रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षामुळे अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती आदी मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बोर्ड ऑफ ट्रेडचे (बीओटी) सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. बीओटीचे १३५ हून अधिक सदस्य आहेत. भारत मंडपम येथे १६ जानेवारी रोजी ही बैठक होत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मंत्री गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंडळामध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. बैठकीत निर्यात प्रोत्साहन परिषदेचे प्रतिनिधी निर्यात क्षेत्राबाबत आपले विचार मांडतील.

बोर्ड व्यापार आणि उद्योगांशी नियमित चर्चा आणि सल्लामसलत करण्याची आणि सरकारला विदेशी व्यापारावरील धोरणात्मक उपाययोजनांबद्दल सल्ला देण्याची संधी देते. तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यापार धोरणावर त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करण्यासाठी आणि केंद्र सरकारला भारताच्या व्यापार क्षमता आणि संधींवर परिणाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती देण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.

एप्रिल-नोव्हेंबर २०२३-२४ मध्ये देशातील व्यापारी मालाची एकत्रितरीत्या निर्यात ६.५१ टक्क्यांनी घसरून २७८.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली. तेलाच्या आयातीत घट झाल्यामुळे आठ महिन्यांच्या कालावधीत आयात ८.६७ टक्क्यांनी घसरून ४४५.१५ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत व्यापार तूट गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १८९.२१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १६६.३५ अब्ज डॉलर्स इतकी झाली.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा; ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

चांदी जैसा रंग, सोने जैसा भाव...; मूल्य, परताव्याबाबत २०२५ मध्ये चांदीच ठरली सरस

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी