राष्ट्रीय

लासलगावला टोमॅटो २ रुपये किलो शेतकऱ्यांनी दिला रस्त्यावर फेकून

प्रतिनिधी

लासलगाव :गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांची मोठमोठी होर्डिंग लावणारा टोमॅटो आता मात्र त्यांच्यावर रुसला आहे. सरासरी २६०० रुपये प्रति क्रेट विकला गेलेला टोमॅटो सध्या १०० रुपये प्रति क्रेटने विकला जात आहे. टोमॅटो अवघे दोन ते पाच रुपये किलोने विकला जात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्यापर्यंत अनेक उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यधीश केलेल्या टोमॅटोने आता त्याला रडविण्यास सुरुवात केली आहे. भाव वाढले तेव्हा केंद्र सरकारने तत्परतेने टोमॅटो आयात करत भाव घसरण थांबवली आणि आता टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त होत आहे, मात्र शासन काही लक्ष देत नसल्याची खंत शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोला अक्षरशः २ ते ५ रुपये किलोला बाजारभाव मिळाल्याने विक्रीसाठी आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने संताप व्यक्त करत बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून देत रोष व्यक्त केला.

वीस किलोच्या कॅरेटला ५० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले, मात्र मोठ्या प्रमाणात त्याच्या भावात घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि मजुरी खर्च निघणे मुश्कील झाल्याने गांजाच्या शेतीची परवानगी देण्याची मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करत आहे. भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. भाव कमालीचे घसरल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून आपला संपात व्यक्त केला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त