राष्ट्रीय

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास महागला; १ एप्रिलपासून मोजावी लागणार 'इतकी' किंमत

या पासमुळे वाहनधारकांना वारंवार FASTag रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. एकदाच वार्षिक शुल्क भरल्यावर टोल भरता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग (FASTag) वार्षिक पासच्या शुल्कात किरकोळ केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी या पासची किंमत ₹३,००० वरून ₹३,०७५ करण्यात आली आहे. सरकारने १५ मार्च रोजी याबाबत अधिसूचना जारी केली असून नवीन दर १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत.

FASTag वार्षिक पास म्हणजे काय?

FASTag वार्षिक पास नॉन-कमर्शियल खासगी वाहनांसाठी (कार, जीप आणि व्हॅन) उपलब्ध आहे. या पासमुळे वाहनधारकांना वारंवार FASTag रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. एकदाच वार्षिक शुल्क भरल्यावर टोल भरता येतो.

हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील सुमारे १,१५० टोल प्लाझांवर वापरता येतो.

एका वर्षात २०० टोल क्रॉसिंगची सुविधा

हा पास सुरू झाल्यानंतर एक वर्षात जास्तीत जास्त २०० वेळा टोल क्रॉसिंग करता येते.
२०० क्रॉसिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा एक वर्षाची मुदत संपल्यानंतर FASTag पुन्हा सामान्य 'पे-पर-यूज' मोडमध्ये चालू होतो.

पास कसा ॲक्टिव्हेट करायचा?

वाहनधारक राजमार्ग यात्रा (Rajmarg Yatra) मोबाईल ॲप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वार्षिक पाससाठी पैसे भरू शकतात. पेमेंट झाल्यानंतर दोन तासांत FASTag पास ॲक्टिव्हेट होतो.

योजनेला मोठा प्रतिसाद

टोल नाक्यांवरील गर्दी आणि थांबण्याची वेळ (Waiting Time) कमी करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी FASTag वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत ५.६ दशलक्षांहून अधिक लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

मात्र, हा पास फक्त NHAI किंवा केंद्र सरकारच्या टोल प्लाझांवरच लागू आहे. राज्य सरकार किंवा इतर संस्थांच्या टोल मार्गांवर नेहमीप्रमाणे FASTag मधूनच टोल वसूल केला जाईल.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड