राष्ट्रीय

आर्थिक संकट गडद होण्याची भीती; जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी िडमन यांचा इशारा

रशियाचे युक्रेनवर आक्रमण आणि फेडरल रिझर्व्हचे चलनविषयक धोरण पाहता मंदीचे संकेत मिळत आहेत.

वृत्तसंस्था

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी जगात लवकरच मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहेच आणि आता मंदीची भीती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही व्यक्त केली आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात जाईल, असे डिमन यांनी म्हटले. मोठ्या प्रमाणावर वाढणारी महागाई, वाढते व्याजदर, रशियाचे युक्रेनवर आक्रमण आणि फेडरल रिझर्व्हचे चलनविषयक धोरण पाहता मंदीचे संकेत मिळत आहेत.

डिमन म्हणाले की, वरील मुद्दे खूप गंभीर असून त्या अमेरिका आणि संपूर्ण जगाला धक्का देतील असे मला वाटते. म्हणजे, युरोप आधीच मंदीच्या गर्तेत आहे आणि ते आतापासून सहा ते नऊ महिन्यांत अमेरिकेला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मंदीत ठेवण्याची शक्यता आहे, असे. एस ॲण्ड पी ५०० निर्देशांक सुमारे २४ टक्के घसरले असून, सर्व यूएस निर्देशांक सध्या घसरणीचे कल दर्शवत आहेत.

अमेरिकन शेअर बाजार आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे जेमी डिमन यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, एस ॲण्ड पी ५०० त्याच्या सध्याच्या पातळीपासून आणखी २० टक्के सहज घसरेल. ही घसरण आधीच्या २० टक्क्यांहून अिधक घसरणीपेक्षा अधिक वेदनादायक असेल. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला जेमी डिमन यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक चक्रीवादळाचा सामना करण्यास तयार राहण्यास सांगितले. जेपी मॉर्गन इन्व्हेस्टमेंट बँकेने जुलैमध्ये समभाग खरेदी करणे थांबवले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?