राष्ट्रीय

लढाऊ विमानांनी आकाशात केले त्रिशूळ; हवाई दलाच्या कसरतींनी सर्वांचेच लक्ष वेधले

राजपथावरील यंदाच्या परेड सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथावरही यंदा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. हवाई दलाच्या हवाई कसरतींनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यात लढाऊ विमानांनी ९०० किमी प्रतितास या वेगाने केलेल्या कसरती डोळ्यात साठवणाऱ्या होत्या. कर्तव्य पथावरील आकाशात भारतीय हवाई दलाच्या जवानांनी चित्तथरारक कसरती करुन दाखवल्या. यावेळी, भारताच्या सहा राफेल फायटर जेटने वजरंग आसनातील कसरत हवेत करुन दाखवली. तर, सुखोई ३० एमके विमानांनी ९०० किमी प्रति तासाच्या वेगाने हवेत कसरती केल्या. यावेळी, त्यांनी तीन विमान एकत्रित करुन त्रिशुळ ही संकल्पना सादर केली होती. यावेळी, कर्तव्य पथावरील नागरिकांना टाळ्या वाजवून दाद दिली.

राजपथावरील यंदाच्या परेड सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल १४ हजार जवान प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून उभे आहेत. राजपथावर देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिकतेचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचे प्रदर्शन झाले. या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर प्रदेश सरकारने रामललाचे दर्शन घडवले, तर महाराष्ट्र सरकारने बाल शिवाजीचे रुप साकारल्याचं पाहायला मिळाले. यासह, सैन्य दलाच्या कवायती आणि परेड पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. यामध्ये राजपथावर बुलेट व दुचाकी वाहनावरुन जवानांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कसरती करुन दाखवल्या.

‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा परेड झाली. यात परेडमध्ये १३ हजार प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते. तर, यंदा प्रथमच समाजातील सर्वच वर्गातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेता आला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी