राष्ट्रीय

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुधात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला

प्रतिनिधी

प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले बाबा रामदेव हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस एक व्हिडीओ वायरल होत असून त्यामध्ये राजस्थानच्या एका कार्यक्रमात मुस्लिम धर्माबाबत केलेल्या विधानामुळे भावना दुखावल्याचे तक्रार राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाने केली आहे. यावरून त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “धर्मांतराच्या बाबतीत मुस्लीम आणि ख्रिश्चन समानच आहेत. मी कुणावरही टीका करत नाही आहे, पण काही लोकांना इतर धर्मातून आपल्या धर्मात धर्मांतरित करण्याची फार ओढ असते. इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे असून ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून घेऊन जा किंवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा. ५ वेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल पण अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे”, असं ते म्हणाले होते. “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे होत नाही. असे कुराण आणि बायबलमध्ये लिहले नाही, मात्र असे सांगितले जाते." त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video

आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!