प्रकाशनापूर्वीच नरवणे यांच्या पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी FIR Photo : PTI
राष्ट्रीय

प्रकाशनापूर्वीच नरवणे यांच्या पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी FIR

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर आणि ‘ऑनलाइन न्यूज फोरम’वर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. ज्यात पुस्तकाची ‘प्री-प्रिंट’ प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर आणि ‘ऑनलाइन न्यूज फोरम’वर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. ज्यात पुस्तकाची ‘प्री-प्रिंट’ प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरी मिळालेली नाही. पोलिसांच्या तपासात समोर आले की, याच शीर्षकाची एक टाइप-सेट पुस्तकाची पीडीएफ प्रत काही वेबसाइट्सवर उपलब्ध होती.

‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ने तयार केलेली तीच प्रत असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, काही ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर पुस्तकाचे मुखपृष्ठ अशा प्रकारे दाखवण्यात आले होते जणू ते खरेदीसाठी उपलब्ध आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हा दाखल केला आहे. अप्रकाशित आणि मंजूर नसलेल्या पुस्तकातील मजकूर सार्वजनिक कसा झाला आणि यामागे कोण लोक सामील आहेत, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे सरकार अडचणीत

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ४ फेब्रुवारीला संसद परिसरात या पुस्तकाची एक प्रत दाखवताना पाहिले गेले होते. यावेळी राहुल म्हणाले होते, ‘जर पंतप्रधान मोदी संसदेत आले तर मी त्यांना हे पुस्तक देईन’. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता