राष्ट्रीय

बँकांना पाच दिवस सुट्टी; या आठवड्यात फक्त तीन दिवस बँकिंग कामकाज चालणार

१४ ऑगस्टला रविवार असल्याने तर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकांच्या शाखा बंद राहणार

वृत्तसंस्था

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टसाठी जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या महिन्यात वेगवेगळ्या कारणांमुळे बँका १८ दिवस बंद राहणार आहेत. १ ऑगस्टलाही बँका बंद होत्या. आता ८ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त सुट्ट्या असतील. ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान बँका पाच दिवस बंद राहतील. याचा अर्थ या आठवड्यात फक्त तीन दिवस बँकिंग कामकाज चालेल.

मंगळवारी (९ ऑगस्ट) बँकेत मोहरमची सुट्टी असणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१२ ऑगस्ट) रक्षाबंधनाची सुट्टी असेल. काही ठिकाणी ११ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुटीही असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने १३ ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. १४ ऑगस्टला रविवार असल्याने तर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. या आठवड्यानंतर १८ ऑगस्ट (गुरुवार) आणि १९ ऑगस्ट (शुक्रवार) जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी असेल. महिन्याचा चौथा शनिवार असल्याने पुढील सुट्टी २७ ऑगस्टला असेल. २८ ऑगस्टला रविवार असल्याने बँका बंद राहतील.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत