संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

जगनमोहन रेड्डींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; टीडीपी आमदाराने केला गंभीर आरोप

तेलुगू देसम पक्षाच्या आमदाराने नोंदविलेल्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, दोन ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि दोघा निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.

Swapnil S

गुंटूर (आंध्र प्रदेश) : तेलुगू देसम पक्षाच्या आमदाराने नोंदविलेल्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, दोन ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि दोघा निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. तेलुगू देसम पक्षाचे आमदार के. रघुराम कृष्ण राजू यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेड्डी यांच्यासह पोलिसांनी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पी. व्ही. सुनीलकुमार आणि पीएसआर सीतारामनजनेयुलू, निवृत्त पोलीस अधिकारी आर. विजय पॉल आणि गुंटूरच्या सरकारी सार्वजनिक रुग्णालयाच्या माजी अधीक्षिका जी. प्रभावती यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. आमदार राजू यांनी एका महिन्यापूर्वी ई-मेलद्वारे तक्रार नोंदविली होती, त्याबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आपण जगनमोहन रेड्डी आणि अन्य यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपला कोठडीत छळ करण्यात आल्याचा आरोपही राजू यांनी केला आहे. रेड्डी आणि अन्य अधिकाऱ्यांनी आपल्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे कारस्थान रचल्याचा आरोपही राजू यांनी केला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश