राष्ट्रीय

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; पुत्र हेमंत यांची भावूक पोस्ट - "आज मैं शून्य हो गया"

त्यांचे सुपुत्र तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करीत लिहिले, “प्रिय दिशोम गुरूजी आपल्या सर्वांना सोडून गेले. आज मी सर्व...

Krantee V. Kale

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य, खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि.०४) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते आणि काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

त्यांचे सुपुत्र तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. “प्रिय दिशोम गुरूजी आपल्या सर्वांना सोडून गेले. आज मी सर्व काही गमावले (आज मैं शून्य हो गया हूँ)...,” असा भावनिक संदेश त्यांनी लिहिला.

राजकारणातील चार दशकांच्या कारकिर्दीत शिबू सोरेन आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले तसेच दोन वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्य केले असून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होता. शिबू सोरेन यांना जूनच्या अखेरीस त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात किडनीशी संबंधित आजारामुळे दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार