राष्ट्रीय

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी चार जणांना अटक

सुधीर व सुखविंदर यांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री सोनालीला जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे.

वृत्तसंस्था

हरियाणाच्या भाजपनेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी शनिवारी कर्लीज क्लबचा मालक व एका ड्रग्ज पॅडलरला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सुधीर सांगवान व सुखविंदरसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कर्लीज क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले आहे. गोव्याचे आयजी ओमवीर बिश्नोई यांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान, कोर्टाने सुखविंदर सिंह व सुधीर सांगवान यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुधीर व सुखविंदर यांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री सोनालीला जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे. त्यांनी लिक्विडमध्ये मिसळून केमिकल दिले; पण ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनालीची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. ते त्याच अवस्थेत तिला वॉशरूममध्ये घेऊन गेले. ते तिथे तिच्यासोबत तब्बल दोन तास होते.

Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

Thane Ganeshotsav 2026 : 'प्रसादा'साठी व्यावसायिक गॅस सिलिंडर अनिवार्य

Mumbai : आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; आणखी एक आत्महत्या, छळ करून हत्या झाल्याचा आईचा आरोप

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

Maharashtra TET Paper Leak : ८,००० रुपयांसाठी बुटांमध्ये लपवून चोरल्या प्रश्नपत्रिका