राष्ट्रीय

मोफत योजना ह्या कधीच ‘मोफत’ नसतात; अशिमा गोयल यांचे मत

गोयल पुढे म्हणाल्या की, सरकारी एखादी योजना मोफत देते, तेंव्हा त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करते

वृत्तसंस्था

मोफत योजना ह्या कधीच ‘मोफत’ नसतात आणि अशा योजना राजकीय पक्ष जाहीर करतात, तेंव्हा त्यांनी अशा योजनांसाठी निधी कुठून देणार याबाबत मतदारांकडे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य अशिमा गोयल यांनी रविवारी मांडले.

गोयल पुढे म्हणाल्या की, सरकारी एखादी योजना मोफत देते, तेंव्हा त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करते. सार्वजनिक माल आणि सेवेसाठी होणारा हा खर्च सरकारी तिजोरीतूनच केला जातो. मोफत योजना कधीच मोफत नसते...विशेषत: सबसिडी ह्या त्रासदायक असतात कारण त्याचा परिणाम वसतुंच्या किंमतीवर होत असतो, असे त्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली