दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा जानेवारीत लिलाव
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा जानेवारीत लिलाव  
राष्ट्रीय

दाऊदला दणका! बंगल्यासह आंब्याच्या बागांचाही जानेवारीमध्ये होणार लिलाव

Swapnil S

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरी येथील मालमत्तांचा लिलाव ५ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील बंगले आणि आंब्याच्या बागांसह चार मालमत्ता तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (सफेमा) जप्त करण्यात आल्या आहेत.

सरकारने यापूर्वी दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांच्या अनेक मालमत्तांची ओळख पटवून त्यांचा लिलाव केला आहे, ज्यात ४.५३ कोटी रुपयांना विकलेले रेस्टॉरंट, ३.५३ कोटी रुपयांना विकलेले सहा फ्लॅट आणि ३.५२ कोटी रुपयांना विकलेल्या गेस्ट हाऊसचा समावेश आहे.

डिसेंबर 2020 मध्ये दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा लिलाव 1.10 कोटी रुपयांना करण्यात आला होता, ज्यात दोन भूखंड आणि बंद पडलेल्या पेट्रोल पंपाचा समावेश होता. खेड तालुक्यातील लोटे गावातील ही मालमत्ता दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या नावावर नोंदणीकृत होती.

नागपाडा येथील ६०० चौरस फुटांच्या फ्लॅटचा एप्रिल २०१९ मध्ये १ कोटी ८० लाख रुपयांना लिलाव करण्यात आला होता. २०१८ मध्ये सफेमाअधिकाऱ्यांनी दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथील मालमत्तेचा लिलाव ७९.४३ लाख रुपयांच्या राखीव किमतीत केला होता, जो सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) ३.५१ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

LICची 'एक नंबर' स्कीम; छोटी रक्कम गुंतवून मिळेल लाखोंचा फायदा