राष्ट्रीय

गुरुग्राममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - पाच आरोपींवर गुन्हा दाखल

मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत

नवशक्ती Web Desk

गुरुग्राम : सोहना शहराजवळील एका गावात बुधवारी पहाटे १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून पाच तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे पाचही जण फरार असून सोहना शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकते. घटना घडली तेव्हा मुलीचे आई-वडील घरी नव्हते. तिचा लहान भाऊ आणि बहीण घरीच होते. मुलीचे काका बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भावाच्या घरी पोहोचले असता त्यांना मुलगी बेपत्ता असल्याचे दिसले. त्यानंतर काकांनी पीडितेच्या घरासमोरील घरातून पाच तरुण बाहेर येताना पाहिले. त्याचवेळी पीडित मुलगीही त्या घरातून रडत बाहेर आली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पाच तरुणांनी तिला तिच्याच घरासमोरील घरात जबरदस्तीने नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि तिला जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सोहना शहर पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार आणि आणि बालक संरक्षण कायद्यांतर्गत पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

MMRC चा मोठा निर्णय; सोमवारपासून Aqua Line मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा

BCCI च्या निर्णयाने KKR ला धक्का; बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर

प्रियांका गांधींचा मुलगा रेहान वाड्रा आणि अविवा बेगचा साखरपुडा चर्चेत; दोघांच्या क्लासी लूकने वेधले लक्ष

ॲास्करच्या शर्यतीत 'दशावतार', पहिल्या दीडशे चित्रपटात दशावतारची वर्णी

फूड डिलिव्हरी बॉयपासून कॉर्पोरेट मीटिंगपर्यंत: नवी मुंबईतील तरुणाने शेअर केला दीड वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; Video व्हायरल