PM
राष्ट्रीय

उत्तर चेन्नईत खत प्रकल्पात वायू गळती ;अनेकजण रुग्णालयात दाखल

Swapnil S

चेन्नई : उत्तर चेन्नईच्या किनाऱ्यावर असलेल्या खत निर्मिती युनिटशी जोडलेल्या उपसमुद्रातील पाइपलाइनमधून अमोनिया वायूची गळती झाली. ज्यामुळे लोकांना दम लागणे, मळमळ आणि अशक्तपणा आल्याने सुमारे २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले.

गळतीनंतर, २६ डिसेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता, उत्तर चेन्नई भागात हवेतून लोकांना प्रचंड अस्वस्थता निर्माण करणारी दुर्गंधी पसरली. त्यांच्या घशात आणि छातीत जळजळ झाल्यामुळे अनेक लोक बेशुद्धही झाले. झोपलेले बरेच लोक घाबरून जागे झाले आणि घराबाहेर पडले आणि शेजाऱ्यांना सावध केले आणि ते सर्व लवकरच मुख्य रस्त्यांवर पोहोचले काय करावे हे सुचेना.

आरोग्य मंत्री सुब्रमण्यन यांनी येथील शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला भेट दिली आणि गॅसबाधित भागातील लोकांशी चर्चा केली. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, मुरुगप्पा ग्रुप या खत निर्मिती कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, "नियमित कार्याचा भाग म्हणून, आम्हाला २६ डिसेंबरला रोजी रात्री ११.३० वाजता अमोनिया अनलोडिंग सबसी पाइपलाइनमध्ये, प्लांट परिसराच्या बाहेर, किनाऱ्याजवळील दोष लक्षात आला. त्यानंतर आण्ही पावले उचलून  आम्ही अमोनिया प्रणाली वेगळी केली आणि कमीत कमी वेळेत परिस्थिती सामान्य केली. या घटनेमुळे सकाळी स्थानिकांनी कंपनी बंद करण्यासाठी घोषणा देत कंपनीच्या दारासमोर आंदोलन केले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस