राष्ट्रीय

गौतम अदानी करणार ६० हजार कोटी रुपयांचे दान

६० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी ही रक्कम दान केली जाणार

वृत्तसंस्था

आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी ६० हजार कोटी रुपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. अदानी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी ही रक्कम दान केली जाणार आहे. या रक्कमेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनतर्फे केले जाणार आहे.

गौतम अदानी यांनी सांगितले की, ही रक्कम आरोग्य सुविधा, शिक्षण व कौशल्य विकास आदी कार्यासाठी खर्च केले जाईल. भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या इतिहासात आतापर्यंत हे सर्वात जास्त मोठे दान आहे.

भारतातील आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकास आदी कार्यक्रमांना चालना देण्याची गरज आहे. या क्षेत्रात योग्य प्रकारे काम होत नसल्याने ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होत आहे.

अदानी समूहाने सांगितले की, आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकास आदी क्षेत्रात काम करण्याचा समूहाला मोठा अनुभव आहे. त्यामुळे या क्षेत्रात व्यापक काम करून देशातील तरुणांना कौशल्ययुक्त बनवण्याचे काम केले जाईल.

अदानी समूहाने ६० हजार कोटी रुपये दान केल्याबद्दल अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी ‘महान दान’ या शब्दात कौतूक केले आहे. अदानी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले दान हे त्यांची जनकल्याणाबाबतची कळकळ दाखवून देते.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन