बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप X
राष्ट्रीय

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

गाझियाबादमध्ये ७ वर्षीय चिमुरडीचा विवस्त्र मृतदेह बांधकामाधीन मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला. अत्याचारानंतर हत्येचा आरोप असून पोलिसांनी POCSOसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Mayuri Gawade

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सात वर्षांच्या चिमुकलीवर कथित लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज नगर एक्स्टेन्शन परिसरातील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या मॉलच्या तळघरात शनिवारी (दि. ११) पहाटे तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

खाऊचे आमिष दाखवून नेल्याचा आरोप

मृत मुलीचे कुटुंब मूळचे बिहारमधील असून, ते गेल्या काही वर्षांपासून बांधकामस्थळाजवळ तात्पुरत्या निवाऱ्यात राहत होते. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, दोन जणांनी चिप्स, खाऊ आणि कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून मुलीला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह इमारतीच्या बेसमेंट-२ मध्ये टाकून देण्यात आला.

शरीरावर गंभीर जखमा

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. डोके आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. तसेच हात-पायही मोडल्यासारखे दिसत होते. त्यांच्या आरोपानुसार, मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

दरम्यान, प्राथमिक तपासात मुलीच्या जखमा उंचावरून पडल्यामुळे झालेल्या नसाव्यात, असा संशय पोलिसांना आहे. तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडसारख्या वस्तूने वार करण्यात आला असावा, या शक्यतेनेही तपास सुरू आहे. मात्र, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून, तपासाचा भाग म्हणून अनेक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

नंदग्राम विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) प्रियाश्री पाल यांनी सांगितले की, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अपहरण, हत्या, सामूहिक बलात्कार आणि समान हेतूच्या कलमांखाली तसेच पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे का, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता