जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हर बंद 
राष्ट्रीय

जगभरातील लाखो वेबसाइट्स पडल्या बंद; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हरमध्ये बिघाड

जगभरातील इंटरनेट वापरकर्ते शुक्रवारी अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त झाले. अनेक नामांकित वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडल्या. या गोंधळासाठी ‘कंटेंट सर्व्हिस प्रोव्हायडर क्लाऊडफ्लेअर’ जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जगभरातील इंटरनेट वापरकर्ते शुक्रवारी अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त झाले. अनेक नामांकित वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडल्या. या गोंधळासाठी ‘कंटेंट सर्व्हिस प्रोव्हायडर क्लाऊडफ्लेअर’ जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

कॅन्व्हा आणि डाऊनडिटेक्टरसह अनेक मोठ्या सेवांवर या गोंधळाचा परिणाम झाला आहे. अचानक वेबसाइट्स बंद पडल्याने लाखो युजर्सचे महत्त्वाचे काम थांबले. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. क्लाऊडफ्लेअरच्या बिघाडामुळे अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स बंद पडल्याने ग्रेाडब्ल्यू आणि आणि झेरोधासारख्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सनाही त्याचा फटका बसला. काही युजर्सना ऑनलाइन पेमेंट्स करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. युजर्सनी एक्सवर प्रतिक्रिया देत, अचानक इतक्या सेवा बंद कशा झाल्या, असा संतप्त सवाल विचारला.

क्लाऊडफ्लेअरचे स्पष्टीकरण

कंपनीने सांगितले की तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे आणि डॅशबोर्ड तसेच एपीआय सेवा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्लाऊडफ्लेअरच्या स्टेटस पेजवरील माहितीनुसार, अनेक ग्राहकांना वेबसाइट आणि डॅशबोर्डवर एरर दिसत होती.

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हर बंद

गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे अचानक अनेक वेबसाइट्स बंद पडल्या होत्या आणि त्यावेळीही क्लाऊडफ्लेअरच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला होता. क्लाऊडफ्लेअर अनेक वेबसाइट्सचा कंटेंट होस्ट करतो. त्यामुळे त्याच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला तर जगभरातील लाखो वेबसाइट्स आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होतो.

Mumbai : धारावीतील झोपडीधारकांची पात्रता लवकरच निश्चित होणार; धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग, लवकरच मास्टर प्लॅनला मंजुरी

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांचा ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणा, विक्रमवीर रिता शेर्पा यांची मागणी

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच

UPSC 2027 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर