सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके  
राष्ट्रीय

सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके

सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार धार्मिक तेढाला खतपाणी घालत असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी रविवारी केला.

Swapnil S

पणजी : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार धार्मिक तेढाला खतपाणी घालत असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी रविवारी केला. लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची पक्षांतरे घडवणे आणि ‘मतचोरी’च्या प्रकारांवरही त्यांनी टीका केली.

देशातील नागरिकांनी धार्मिक आणि जातीच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन दीपके यांनी केले. पणजी येथे सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना दीपके म्हणाले की, सीजेपी भारताला एकत्र आणण्यासाठी काम करीत आहे. लोकांना एकत्र आणणे तसेच म. गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारताची सामाजिक वीण पुन्हा मजबूत करणे, यासाठी सीजेपी कटिबद्ध आहे.

नागरिकांनी नेहमीच एक नागरिक म्हणून आपल्या क्षमतेचा विचार केला पाहिजे. जेव्हा ही क्षमता हिरावून घेतली जाते आणि हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणून विचार करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. त्याचबरोबर या प्रश्नांना जबाबदार असलेल्या सरकारला जाब विचारणेही थांबते, असे दीपके म्हणाले.

सत्ता कायम आपल्याकडेच राहावी, यासाठी राजकीय पक्ष लोकांमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावर फूट पाडली जात असल्याचा आरोप दीपके यांनी केला. धर्म, जात, पंथ किंवा राजकीय विचारसरणी यांचा विचार न करता नागरिकांना एकत्र आणणे, हे सीजेपीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार

महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत

पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला

Mumbai : 'हरितवारी जलतिरी' प्रकल्प अंधारात; सायकल ट्रॅक, पदपथांवरील बत्तीगुल

भाजप, आरएसएस असभ्य - राहुल गांधी