राष्ट्रीय

सोन्याने पार केला लाखाचा टप्पा; १० ग्रॅम सोने १,०१,२४५ रुपये

गेले अनेक महिने सातत्याने वाढणाऱ्या सोन्याने अखेर १ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात मंगळवारी १८०० रुपयांनी वाढ झाली.

Swapnil S

नवी दिल्ली : गेले अनेक महिने सातत्याने वाढणाऱ्या सोन्याने अखेर १ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात मंगळवारी १८०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर १,०१,२४५ रुपये झाला. लग्नसराईचे दिवस व अक्षय तृतीयेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. तसेच जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढीस लागल्याने सोन्याच्या ‘अखिल भारतीय सराफा असोसिएशन’ने सांगितले की, ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात मंगळवारी १८०० रुपयांनी वाढ होऊन ते १,०१,६०० रुपये झाले. सोमवारी याचा दर ९९,८०० रुपये होता, तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर २८०० रुपयांनी वधारून १,०२,१०० रुपये झाला, तर सोमवारी हा दर ९९,३०० रुपये होता.

यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे. यंदा मेच्या अखेरपर्यंत विवाहाचा सीझन आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

चार महिन्यांत २२,६५० रुपयाने वाढ

डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा दर ७८ हजार रुपयांच्या आसपास होता. गेल्या चार महिन्यांत सोन्याचा भाव १० ग्रॅमला २२,६५० रुपयांने वाढला आहे. सोन्याने चार महिन्यांत २९ टक्के वाढ नोंदवली आहे, तर चांदीचा दर स्थिर आहे. मंगळवारी चांदीचा दर किलोला ९८,५०० रुपये आहे.

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चार जणांची रवानगी तुरुंगात